“मिशन लक्ष्यवेध" अंतर्गत 27 एप्रिल रोजी अॅथलेटिक्स निवड चाचणी

यवतमाळ दि.२४ : राज्यातील क्रीडा विकासाला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या "मिशन लक्ष्यवेध" या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडूंची निवड करण्यासाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी दि. 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे. सदर चाचणीमध्ये खेळाडूंच्या क्रीडा कौशल्यांच्या चाचण्या घेऊन गुणवत्ता आधारित निवड केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेत ज्या खेळाडूंनी पूर्वी अर्ज सादर केलेले आहेत त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच, ज्या इच्छुक खेळाडूंनी अद्याप नोंदणी केलेली नाही, परंतु या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा आहे, अशा खेळाडूंनाही अर्जासह थेट उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांना 9890981728 या क्रमांकावर संपर्क करुन शंकांचे निरसन करावे, जास्तीत जास्त लोकांनी या चाचणीत सहभागी होण्याचे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित