मधमाशीपालनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधुमित्र, मधुसखींना पुरस्कार मिळणार
नामांकन अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र”व “मधुसखी” पुरस्कारांसाठी इच्छुकांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी व यशस्वी मधपाळांचा गौरव करण्यासाठी ही योजना अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका पुरस्काराचा महिला मधपाळांसाठी (मधुसखी) राखीव समावेश आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय ५ हजार रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे.
दि. २० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिन निमित्त जिल्हा पुणे येथे आयोजित समारंभात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्जाची लिंक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mskvib.org वर उपलब्ध असून, संबंधित जिल्ह्यातील खादी मंडळाच्या कार्यालयातही नामांकन अर्ज मिळणार आहेत.
जिल्ह्यातील इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. किंवा संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर (दूरध्वनी ०२१६८-२६०२६४) येथेही माहिती असून जास्तीत जास्त पात्र मधपाळांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment