शासकीय संगणक टंकलेखन परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती लाभ
३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि.7 (जिमाका) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी-टीबीसी) लघुलेखन परीक्षा दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातात. जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १० मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अमृत संस्थेच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतावा (प्रतिपूर्ती) देण्यात येणार आहे. या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी घटकांचा समावेश आहे.
हा लाभ मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahaamrut.org.in/ ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ आहे.
ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे :
गत आर्थिक वर्ष (सन २०२५-२६) किंवा पुढील आर्थिक वर्ष (सन २०२६-२७) साठी लागू असलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र,राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र,लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा शाळा सोडल्याचा दाखला / शाळा निर्गम प्रमाणपत्र, जानेवारी २०२६ परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बँक खात्याच्या तपशीलासाठी पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश याची स्पष्ट प्रत पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), यवतमाळ यांनी केले आहे.
Comments
Post a Comment