शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

 


            यवतमाळ, दि. 1 (जिमाका) : यवतमाळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या उंच टाकीच्या व्हर्टिकल असेंब्लीची दुरुस्ती तसेच अन्य तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे ऑफीस मुख्य संतुलन टाकी (एमबीआर) झोन अंतर्गत येणाऱ्या शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे.

            यामध्ये गोधनी, रुख्मिणी नगर-भोसा, चापडोह पुनर्वसन, जिंद्रान नगर, राजाराम नगर, आर.टी.ओ., सेवानगर आणि निखील नगर (उमरसरा) या भागांत  होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तांत्रिक कामांसाठी संबंधित प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, जल व्यवस्थापन संजय उमाळे यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित