निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ॲप कार्यशाळा
यवतमाळ, दि. 1
(जिमाका) : यवतमाळ
कोषागार कार्यालयातर्फे राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी
‘महा-उपलब्धी’ अधिकृत मोबाईल ॲप कार्यान्वित करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले आहे. ही कार्यशाळा मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बळीराजा चेतना
भवन (बचत भवन), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे होणार आहे.
कार्यशाळेत प्रधान सचिव मार्गदर्शन करणार
असून, निवृत्तीवेतनधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ॲपबाबतच्या अडचणींचे निराकरण करून
घ्यावे, असे आवाहन कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment