मेरा युवा भारत यवतमाळतर्फे विविध उपक्रमांतून जयंती व स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

 यवतमाळ : मेरा युवा भारत (MY Bharat) यवतमाळ यांच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती, जागतिक वयोवृद्ध नागरिक दिन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि वक्तृत्व स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात आले.


या उपक्रमांना जगदंबा महाविद्यालय, वसंतराव नाईक विद्यालय आणि जवाहरलाल दर्डा महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले. संबंधित संस्थांमधील विद्यार्थी, युवक व स्वयंसेवकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


स्वच्छता मोहिमेअंतर्गत सार्वजनिक परिसरांची स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण करण्यात आले, तर युवकांमध्ये सामाजिक जाणीव व राष्ट्रीय विषयांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध उपक्रमांमध्ये युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.


पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती, जागतिक वयोवृद्ध नागरिक दिन आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमांमधून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग यांचा संदेश देण्यात आला.


मेरा युवा भारत यवतमाळच्या या उपक्रमातून युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्यास तसेच स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्यास प्रोत्साहन मिळाले.






Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित