तरुणांनी मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा – उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गोपाळ देशपांडे







भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच पात्र ठरणाऱ्या नवमतदारांची मतदार यादीमध्ये नोंदणी करून घेण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.


या अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, धामणगाव रोड, यवतमाळ येथे विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, यवतमाळ विधानसभा मतदारसंघ गोपाळ देशपांडे यांनी उपस्थित राहून नवमतदार विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.


यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी कशी करावी, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कशा पद्धतीने भरावा तसेच मतदार म्हणून असलेले अधिकार व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्यही उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदार नोंदणी केली.


लोकशाही व्यवस्थेत नवमतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र युवक-युवतीने आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले.


विशेष मतदार नोंदणी अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणी, मतदानाचा हक्क आणि लोकशाही प्रक्रियेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित