सेवा संकल्प अभियानांतर्गत राळेगाव शासकीय वसतिगृहात विविध उपक्रम
विद्यार्थ्यांचा सामाजिक, पर्यावरणीय,
सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग
यवतमाळ, दि.
6 (जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या
सेवा संकल्प अभियानांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, राळेगाव
येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक
उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला.
अभियानांतर्गत १८ सप्टेंबर रोजी नैसर्गिक
साहित्याचा वापर करून कला, परंपरा आणि संस्कृतीवर आधारित रांगोळी साकारण्यात आली. विद्यार्थ्यांनी
उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा कलात्मक पद्धतीने वापर करून या उपक्रमात सहभाग घेतला.
१९ सप्टेंबर रोजी ‘सेवा माझे योगदान’या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण अभियान राबविण्यात
आले. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाची
गरज याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. २६ सप्टेंबर रोजी ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून
विकसित भारताची संकल्पना मांडली. तसेच ३० सप्टेंबर रोजी ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे
आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थांना आरोग्यविषय मार्गदर्शन करण्यात आले. वसतिगृहातील
विद्यार्थी व कर्मचारी यांनी उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.




Comments
Post a Comment