जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष बोरगाव येथे पीक कापणी प्रयोग
> शेतकऱ्यांशी साधला संवाद ; सवलती
व उपाययोजनांबाबत दिली माहिती
यवतमाळ, दि.
6 (जिमाका) : खरीप हंगामाअंतर्गत यवतमाळ तालुक्यातील मौजा बोरगाव येथे
सोमवारी सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची कापणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसीलदार,
गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, विमा कंपनी
प्रतिनिधी, ग्रामस्तरीय समिती व उपस्थित गावातील शेतकरी यांच्या समक्ष शेतकरी नरेश
बाजीराव गावंडे यांचे शेतातील सोयाबीन पिकाची कापणी व मळणी करण्यात आली.
या सोयाबीन पिकास शेतकऱ्याने तीन वेळा
पाणी दिलेले होते. परंतू दुष्काळजन्य परिस्थितीमुळे प्रयोगाचे उत्पादन १.०९ क्विंटल प्रति हेक्टरी आले.
यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी
शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच शासनाच्या सवलती व
उपाययोजनांबाबत माहिती दिली. यासोबतच शेतकरी बांधवांनी शेती ओलीत करताना पाणी जपून
वापरावे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करावा, पशुधनासाठी चारा पिके लागवड करावी, असे आवाहन
प्रशासनामार्फत करण्यात आले.




Comments
Post a Comment