दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारचा दुसरा ट्रीगर लागू अन्नधान्याची टंचाई निवारणासाठी व्यवस्था उभारण्यावर भर
यवतमाळ : दुष्काळ व्यवस्थापन संहिता
२०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी पातळीवरील सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने दुसरे ट्रिगर लागू केले आहे. यात १३ बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यात ५ ऑक्टोबर २०२६ नंतर पावसाळा संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे दुष्काळ निवारण्यासाठी राज्य शासनाने दुसरे ट्रिगर लागू केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीतील पर्जन्याची तूट निर्माण झाली आहे. यातून विविध घटक प्रभावित झालेले आहेत. यावर मात करण्यासाठी दुसऱ्या ट्रिगरची अंमलबजावणी होणार आहे.
शासकीय मदतीसाठी स्वतंत्र आदेश
ट्रिगर दोन लागू झाला तरी दुष्काळी मदतीसाठी कुठल्याही सूचना तूर्त आलेल्या नाही. यासाठी स्वतंत्र अध्यादेश निर्गमित होणार आहे. यामुळे शासन स्तरावर काय निर्णय घेतला जातो याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. एनडीआरएफच्या निकषांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत मिळणार नसल्याने
या आहेत उपाययोजना
जमीन महसुलात सूट देण्यात आली आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यावर भर, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट (७.५ हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या वीजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. त्यावरील वीज पंपांना यामध्ये सूट देण्यात आली आहे.) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येणार आहे. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याच्या सूचना आहेत. शेतीवर आश्रित शेतकरी, मजूर यांना अन्नधान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी केली जाणार आहे. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जलसंधारणाची कामे सुरू करणे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्यासाठी प्राधान्य
Comments
Post a Comment