शासकीय सेवा शिबिर उत्साहवर्धात संपन्न; १४४ लाभार्थ्यांनी घेतला लाभ
सेवा संकल्प अभियान
यवतमाळ दि. 9 : सेवा संकल्प अभियानातंर्गत तिवसा येथील जिल्हा परिषद शाळा येथे दि. २९ रोजी विशेष शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा व सेवांचा लाभ देण्यात आला, ज्याचा एकूण १४४ लाभार्थ्यांनी यशस्वीपणे लाभ घेतला.
हे शिबिर मंडळ अधिकारी नितीन खरोडे आणि ग्राम महसूल अधिकारी राहुल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबिरात महसूल विभाग, ग्राम विकास विभाग आणि आरोग्य विभाग या शासनाच्या विविध महत्त्वाच्या विभागांनी एकत्र येत नागरिकांना तत्पर सेवा पुरवल्या.
शिबिरादरम्यान नागरिकांना आधार कार्ड अद्ययावतीकरण (आधार अपडेट), मोफत आरोग्य तपासणी आणि महसूल विभागातर्फे ७/१२ उताऱ्यांचे थेट वाटप यांसारख्या प्रमुख सेवा देण्यात आल्या. स्थानिक प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशांची मोठी बचत झाली असून, उपस्थितांनी या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
000
.jpg)
.jpg)

Comments
Post a Comment