महसूल व विविध शासकीय सेवा शिबिराचे आयोजन; नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप सेवा संकल्प अभियान
महसूल व विविध शासकीय सेवा शिबिराचे आयोजन;
नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप
सेवा संकल्प अभियान
यवतमाळ दि. 9 - सेवा संकल्प अभियानातंर्गत दि. ३० सप्टेंबर रोजी महसूल विभाग व इतर प्रशासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सेवा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना, विशेषतः कोलाम जमातीच्या घटकांना तसेच शेतकऱ्यांना विविध शासकीय सेवा आणि दाखले एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले.
या शिबिराला मंडळ अधिकारी प्रीतम गोडे आणि ग्राम महसूल अधिकारी आकाश जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांना तत्पर सेवा पुरवण्यात आल्या.
या शिबिरामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांनी सहभाग नोंदवून नागरिकांना सेवा प्रदान केल्या.
शिबिरादरम्यान प्रामुख्याने कोलाम जातीचे दाखले, शेतकरी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड अपडेट यांसारख्या अत्यंत गरजेच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू घटकांपर्यंत थेट पोहोचावा, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
000

.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment