दुष्काळस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा शनिवारी यवतमाळ दौरा
>
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार ;
>
शेतकऱ्यांशी साधणार संवाद
यवतमाळ, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र
सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथक शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या
दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात केंद्रीय पथकाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची
स्थिती, पीक नुकसानीची पाहणी केली जाणार असून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे.
केंद्रीय पथकाच्या
दौरा कार्यक्रमानुसार ९ ऑक्टोबर रोजी रात्री शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम, १० ऑक्टोबर
रोजी सकाळी १० वाजता यवतमाळ तालुक्यातील मडकोना येथील पीक परिस्थितीची पाहणी व शेतकऱ्यांसोबत
संवाद, सकाळी ११.१० वाजता लासिना येथील पीक परिस्थितीची पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद,
दुपारी १२.२० वाजता नेर तालुक्यातील लोणी येथील पीक परिस्थितीची पाहणी व शेतकऱ्यांसोबत
संवाद, दुपारी १२.५५ वाजता नेर तालुक्यातील
मांडवगड येथील पीक परिस्थितीची पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद, दुपारी १.२५ वाजता शासकीय
विश्रामगृह, नेर येथे राखीव, दुपारी २.४५ वाजता नेर तालुक्यातील वटफळ येथील पीक परिस्थितीची
पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद, दुपारी ३.२५ वाजता नेर तालुक्यातील दोडकी येथील पीक परिस्थितीची
पाहणी व शेतकऱ्यांसोबत संवाद, त्यानंतर नागपूरकडे रवाना होतील.
Comments
Post a Comment