सेवा संकल्प अभियानातंर्गत १२५ लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ




यवतमाळ दि. 9 – सेवा संकल्प अभियानातंर्गत दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी येथे २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:२७ वाजता महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर विशेषतः पारधी समाजातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले होते. 

            या शिबिरामध्ये पारधी समाजातील १२५ नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ घेतला. शिबिरादरम्यान नागरिकांना फेरफार नोंदवणे, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरणे, श्रावण बाळ योजनेचे अर्ज स्वीकारणे, तसेच आधार कार्ड व राशन कार्डशी संबंधित विविध कामे करून देण्यात आली. 

            या शिबिराचे आयोजन व यशस्वी नियोजन मंडळ अधिकारी एम. युसूफ शेख आणि ग्राम महसूल अधिकारी पी. ए. दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराबद्दल आनंदवाडीतील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित