अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक अभय महाजन नियुक्त
अमरावती/यवतमाळ, दि. 6 (जिमाका) :भारत
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार
संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अभय अरविंद महाजन (भाप्रसे) यांची
नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त
नयना गुंडे यांनी दिली आहे.
श्री. महाजन यांचा निवासाचा पत्ता ‘तापी’, सार्वजनिक बांधकाम
विभाग शासकीय विश्रामगृह, चपराशीपुरा, अमरावती असा असून त्यांचा भ्रमणध्वनी
क्र.८९९९१०८९१२ असा आहे. निवडणूक निरीक्षक यांना ‘तापी’, सार्वजनिक बांधकाम विभाग
शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११ ते दुपारी १२ वा. या कालावधीत भेटता येईल. तसेच
नमूद भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. असेही निवडणूक विभागातर्फे
कळविण्यात आले आहे.
Comments
Post a Comment