जवाहर नवोदय विद्यालयात नववी व अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन अंतिम मुदत 15 ऑक्टोबर; १० एप्रिलला प्रवेश परीक्षा
यवतमाळ, दि. 7 (जिमाका):घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता नववी व अकरावी रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.
इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश
परीक्षा शनिवार, १० एप्रिल २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन
प्रवेश अर्ज भरण्यासाठी वर्ग 9 वी करीता https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9/ हा संकेतस्थळ व वर्ग 11 वी करीता https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11/या संकेत स्थळाचा वापर करावा, प्रवेश अर्ज व परिक्षेची
सविस्तर माहिती याच संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाचा वापर
करावा. अधिक माहितीसाठी प्राचार्य, जवाहर
नवोदय विद्यालय, बेलोरा तालुका घाटंजी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य पी.
आर. चापले यांनी केले आहे.
Comments
Post a Comment