अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी विभागातील ८१ मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता
अमरावती दि. १० - महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-२०२६ अंतर्गत अमरावती विभाग मतदारसंघातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या ५ जिल्ह्याच्या क्षेत्रात एकुण ८१ मतदान केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे, अशी माहिती अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता पाठविण्यात आलेल्या ८१ मतदान केंद्रांच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली असल्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी एका पत्राद्वारे विभागीय आयुक्त यांना काल कळविले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या अनुक्रमे पुढील प्रमाणे आहे. अमरावती- २५, अकोला- १३, बुलढाणा- १८, वाशिम- ७, यवतमाळ- १८ अशा एकुण ८१ मतदान केंद्रांना मान्यता मिळाली आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत अमरावती विभागातील या मतदान केंद्रांवर निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
Comments
Post a Comment