सेवा संकल्प अभियानातंर्गत शिबिरातून नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ दिग्रस तालुक्यात वाईमेंढी येथे आयोजन
यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत दिग्रस तालुक्यातील वाईमेंढी येथे महसूल व ग्रामविकास विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.
शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग आणि एसटी महामंडळ यांसारख्या विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रामुख्याने व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातील नागरिकांसह इतर घटकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
शासकीय योजनांचा लाभ देतांना शिबिरात एसटी महामंडळांतर्गत ४०० लाभार्थ्यांना एसटी कार्डचे वाटप करण्यात आले, तसेच नागरिकांसाठी आयुष्मान कार्डचे वाटपही करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, अनेक नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
या शिबिराचे मंडळ अधिकारी म्हणून दीपक सोनुने यांनी जबाबदारी पार पाडली, तर महसूल अधिकारी म्हणून उद्धव वायकुळे यांनी कामकाज पाहिले.

Comments
Post a Comment