नवीन आयडीया सुचविणाऱ्यांसाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’

> पाच कोटींची बक्षिसे ; ५० विजेत्यांची निवड होणार, प्रत्येक विजेत्याला दहा लाखांची वर्क ऑर्डर > सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत "सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६ चे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांवर तंत्रज्ञानाधारीत आणि व्यवहार्य उपाय सुचविणाऱ्या कल्पनांना या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण दहा क्षेत्रे, प्रत्येक क्षेत्रामध्ये पाच उपविषय असणार आहेत. स्पर्धेत दहा क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय मागविण्यात येणार आहेत. प्रत्येक क्षेत्रातील समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय सुचविता येतील. यामध्ये कृषी, गृह कायदा आणि सुव्यवस्था, महिला आणि बालविकास, संरक्षण, नगरविकास, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा, शाश्वतता (उर्जा आणि इतर) पायाभूत सुविधा आणि गतिशीलतk (वाहतूक), उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि विज्ञान आणि संशोधन या नमूद क्षेत्रातील प्रत्येकात ५ उपक्षेत्रात असे ५० विषयांवर स्पर्धा असणार. दैनंदिन समस्या सोडविण्याची संधी सेवा संकल्प अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमाने सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६ या राज्यस्तरीय नाविन्यता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील दैनंदिन समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाधारित व्यावहारिक उपाय सुचविणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत अर्जाची मुदत असून यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवकल्पकांनी सहभागी व्हावे, असे कौशल्य विकास विभागाच्या वतीने सहायक आयुक्त सुशील उचले यांनी आवाहन केले आहे. कोणाला सहभागी होता येईल? या स्पर्धेत वयोमर्यादा किंवा नोंदणी शुल्क नसून विद्यार्थी, प्राध्यापक, स्टार्टअप, बचत गट, सामाजिक संस्था आणि वैयक्तिक नवकल्पकांना सहभागी होता येईल. कृषी, आरोग्य, महिला व बालकल्याण, नागरी विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, शिक्षण व रोजगारक्षमता यांसह दहा क्षेत्रांमध्ये कल्पना सादर करता येतील. पाच कोटी रुपयांचे बक्षीस स्पर्धेसाठी एकूण पाच कोटी रुपयांचे बक्षीस असून, प्रत्येक क्षेत्रातून पाच याप्रमाणे ५० विजेत्यांची निवड होणार आहे. प्रत्येक विजेत्याला १० लाख रुपयांपर्यंतची वर्क ऑर्डर तसेच पायलट प्रोजेक्ट, शासकीय खरेदी आणि इनक्युबेशनची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर इच्छुकांनी १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत https://sevainnovationchallenge.in या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक व ई-मेलद्वारे नोंदणी करून आपली कल्पना सादर करावी. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व संस्थांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून महाराष्ट्राला जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित