जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया आता पूर्णतः ऑनलाइन

नवीन पोर्टल विकसित ; समिती कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या १५ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार जात प्रमाणपत्र पडताळणीची नवीन कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असल्याने अर्जदारांना समिती कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी दिली आहे. अर्जासंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी बार्टी हेल्पडेस्कच्या 02026333339 या क्रमांकावर, व्हॉट्सॲप 9404999452 किंवा helpdesk@barti.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित