कोळी बुजरुक येथे शासकीय सेवांचा ७२ नागरिकांनी घेतला लाभ
सेवा संकल्प अभियान
यवतमाळ दि. 13 - सेवा संकल्प अभियानातंर्गत घाटंजी तालुक्यातील कोळी (बुजरुक) येथे नुकतेच विविध शासकीय सेवा पुरवण्याच्या उद्देशाने एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर ग्रामपंचायत कार्यालय, कोळी (बुजरुक) येथे पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील एकण ७२ नागरिकांनी (लाभार्थी) विविध शासकीय योजनांचा आणि सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी चेतन कोडापे तसेच ग्राम महसूल अधिकारी गणेश सलाम यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले. 'कोलाम विकास' उपक्रमांतर्गत नागरिकांना एकाच छताखाली विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले होते.
या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्रामविकास, कृषी विभाग, आरोग्य विभाग आणि पुरवठा विभाग अशा विविध प्रमुख शासकीय विभागांनी सहभाग नोंदवून नागरिकांना सेवा पुरविल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागातर्फे २३ नागरिकांची तपासणी व उपचार सेवा पुरवण्यात आली, तर इतर विविध विभागांमार्फत ५ नागरिकांना सेवा देण्यात आल्या आहे.
000

Comments
Post a Comment