महसूल व कृषी विभागाच्या वतीने विशेष शिबिर संपन्न;

१६८ लाभार्थ्यांनी घेतला लाभ सेवा संकल्प अभियान यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत अकोला बाजार येथील कोलाम प्रवर्गातील नागरिकांसाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ३० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या शिबिराचे आयोजन मंडळ अधिकारी प्रीतम गोडे आणि ग्राम महसूल अधिकारी आकाश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबिरामध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्र, आधार कार्ड अपडेट यांसारख्या विविध महत्त्वाच्या सेवा नागरिकांना थेट उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण १६८ लाभार्थ्यांनी या विविध योजनांचा व सेवांचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित