नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा उभारा!

> शासन देणार 1 ते 2.5 कोटींचे अनुदान > शेतकरी,सार्वजनिक व खाजगी संस्थांना संधी यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२६-२७ क्षेत्र विस्तार कार्यक्रम नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये नवीन उती संवर्धन (Tissue Culture Lab) प्रयोगशाळा स्थापन करणे या बाबींचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्र - राज्यातील कृषि विद्यापिठांतर्गत तसेच इतर शासन अंगीकृत संस्था यांना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प मुल्याच्या १०० टक्के (जास्तीत जास्त रुपये २५०.०० लाख) इतके अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची कमीतकमी २५.०० लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे. ज्या संस्थाकडे आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध आहे अशाच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थाना नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा मंजूर करण्यात येईल. खाजगी क्षेत्र - खाजगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी, ४० टक्के प्रकल्प मुल्याच्या (जास्तीत जास्त रुपये १००.०० लाख) प्रती प्रयोगशाळा अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. सदरचा प्रकल्प हा बँक कर्जाशी निगडीत असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्रा आधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची कमीत कमी २५.०० लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे. उत्तीसंवर्धन प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाच्या मानके व निकषानुसार अनुदान मिळाल्यापासुन १८ महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक राहील. या घटकांची अनुदान मर्यादा खालीलप्रमाणे आहे. सार्वजनिक क्षेत्र - सार्वजनिक उपक्रम (कृषि विद्यापिठे व सार्वजनिक संस्था / शासकीय प्रक्षेत्र) प्रकल्प खर्च रु. २५०.०० लाखाच्या मर्यादेत, अनुदानाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के आहे. खाजगी क्षेत्र -प्रकल्प क्षेत्र रु. १००.०० लाखाच्या मर्यादेत अनुदानाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के अनुदान देय आहे. सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणेकरीता अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित