मधुमक्षिकापालनाला चालना!

> जिह्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : मधुमक्षिकापालनाला चालना देऊन मध उत्पादन, शेतकऱ्यांचे उत्पन्न व रोजगार वाढविणे, तसेच मध व इतर पोळे उत्पादनांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हा राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. योजनेची प्रमुख उद्दिष्टे - उत्पन्न व रोजगार निर्मिती, दर्जेदार मध केंद्र/साठवण सुविधांचा विकास, मध व इतर पोळे उत्पादनांच्या परीक्षणासाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारणे, मधाचे ब्रॅंडिंग व बाजारपेठ विकास, मधाचे प्रमुख फायदे-मध नैसर्गिक ऊर्जा देणारे व प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असून सर्दी, खोकला, घसा व दमा यांसारख्या त्रासांमध्ये उपयोगी आहे. मधामध्ये अँटीबायोटिक व अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात. पात्रता व महत्त्वाच्या अटी-लाभार्थी संस्था/संघटना यांनी NITI Aayog च्या Darpan Portal वर नोंदणी केलेली असणे आवश्यक NBB चे पात्र सदस्य, पायाभूत सुविधांसाठी मधुमक्षिकापालन, मध उत्पादन, प्रक्रिया व विपणन क्षेत्रातील नोंदणीकृत संस्था पात्र. वैयक्तिक मधुमक्षिका पालकांच्या बाबतीत NBB कडे आधी नोंदणीकृत पालकांना प्राधान्य. आर्थिक मर्यादा- एका संस्था/सदस्याला एका वर्षात प्रकल्पासाठी जास्तीत जास्त ₹४५ लाख निधी मिळू शकतो. ही मर्यादा संस्थेचा अनुभव, क्षमता व NBB च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लागू राहील. अभियानाचे प्रमुख घटक लघु अभियान-१ मधमाशीपालन केंद्रे, मधमाशी प्रजनन केंद्रे, मध परीक्षण प्रयोगशाळा, रोगनिदान व उपचार सुविधा, मध प्रक्रिया केंद्रे, उपकरणे व प्रशिक्षण यांचा विकास. लघु अभियान -२ मध व इतर पोळे उत्पादनांचे संकलन, प्रक्रिया, पॅकिंग, साठवणूक, विपणन केंद्रे व नवीन प्रक्रिया युनिट्सची उभारणी. लघु अभियान- ३ स्थानिक परिस्थितीनुसार संशोधन, तंत्रज्ञान विकास,मधुमक्षिकापालनातील समस्या सोडविणे व मधाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे.(शेतकरी, मधुमक्षिका पालक, FPO, SHG, कंपन्या व संबंधित संस्थांनी NBHM अंतर्गत उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी www.nbhm.gov.in/www.nbb.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मनोजकुमार ढगे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित