अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू ; शस्त्र वापर, वाहतुकीवर निर्बंध

जिल्हादंडाधिकारी विकास मीना यांचे आदेश जारी यवतमाळ दि. 14 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 22 सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी कार्यक्रम घोषित केलेला आहे. जिल्ह्यात निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दि. 22 सप्टेंबरपासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात शस्त्र वापरावर निर्बंध घालणे अत्यावश्यक असल्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्याअनंषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक - २०२६ निवडणुकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून तसेच यवतमाळ जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असून जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रांचा गैरवापर होवू शकतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शहरात गावात शस्त्र वाहून नेण्यास व वापरावर निर्बंध, प्रतिबंध असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी विकास मीना यांनी तसेच परवानाधारक शस्त्रांबाबत लागू असलेल्या निवडणूक विषयक निर्देशांनुसार आवश्यक कार्यवाही करून बेकायदेशीर शस्त्रांची वाहतूक अथवा वापर होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय, जो कोणी या नियमाचे उल्लंघन करेल तो इसम तथा शस्त्र परवानाधारक दंडनीय कार्यवाहीस पात्र ठरणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचेही निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. या आदेशाबाबत ध्वनीक्षेपकावर जाहीर करुन नागरिकांमध्ये जागरुकता करण्याचे निर्देशही जिल्हादंडाधिकारी विकास मीना यांनी पोलीस विभागाला दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित