सेवा संकल्प अभियानांतर्गत कुपटी येथे विशेष शिबिराचे आयोजन विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या नागरिकांना विविध सेवा
यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत उमरखेड तालुक्यातील कुपटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा देण्याच्या उद्देशाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील एकूण ७४ लाभार्थ्यांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.तसेच त्यांना विविध दाखले देण्यात आले.
या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांसारख्या विविध महत्त्वाच्या विभागांनी एकत्र येत नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिल्या.
शिबिरादरम्यान नागरिकांना विविध प्रकारचे दाखले आणि आवश्यक कार्ड्सचे वितरण करण्यात आले. हे शिबीर मंडळ अधिकारी प्रदीप शिवणकर आणि ग्राम महसूल अधिकारी नितीन वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Comments
Post a Comment