नागपूर येथे शुक्रवारी माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार मेळावा
> जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
> पुनर्वसन महासंचालनालयातर्फे आयोजन
यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : माजी सैनिकांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचे नागरी कार्यक्षेत्रात पुन्हा सामावून घेण्याच्या उद्देशाने पुनर्वसन महासंचालनालय माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालय यांच्या वतीने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे माजी सैनिकांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा रोजगार मेळावा नागपूर येथील सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील रोजगार पटावरील माजी सैनिकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment