माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
> वाचना प्रेरणा दिन साजरा
यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी जयंतीनिमित्त वाचना प्रेरणा दिन देखील साजरा करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासनचे तहसिलदार अदित्य शेंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन केले.

Comments
Post a Comment