राजुर येथे कोलाम समाजाच्या नागरिकांना थेट लाभ सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत वणी तालुक्यातील राजुर येथे १६ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात कोलाम प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष सेवा देणाऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने विविध सेवा पुरवण्यात आल्या. शिबिराचा लाभ घेण्यासाठी कोलाम प्रवर्गातील २७ लाभार्थी उपस्थित होते. त्यापैकी १९ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष विविध सेवा देऊन लाभाचे वितरण करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी एस. पी. डांगोले आणि ग्राम महसूल अधिकारी एस. पी. कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment