आष्टीत विशेष शिबिरातून नागरिकांना विविध लाभाचे वितरण सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन
यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानातंर्गत कळंब तालुक्यातील आष्टी येथे १५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महसूल विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमात मंडळ अधिकारी प्रमोद चचाणे, ग्राम महसूल अधिकारी संजय शेंद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरादरम्यान ग्रामपंचायत कार्यालय व इतर विभागांच्या माध्यमातून कृषी विषयक सेवा, महसुली सेवा, आरोग्य विषयक सेवा आणि ग्राम विकास विभागाच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.

Comments
Post a Comment