श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक रेबीज दिन साजरा

> रेबीज आजाराविषयी जनजागृती यवतमाळ, दि. 15 (जिमाका) : रेबीज या प्राणघातक आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, येथे जागतिक रेबीज दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत उईके यांच्या मार्गदर्शनाखाली जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. रेबीजचा प्रसार प्रामुख्याने संक्रमित कुत्रा किंवा इतर संक्रमित प्राण्याच्या चाव्याने, लाळीद्वारे, ओरखडल्याने मानवामध्ये रेबीज हा जीवघेणा आजार होतो. मात्र वेळीच योग्य उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लस घेतल्यास, रेबीज या जीवघेण्या आजारापासून बचाव करता येतो. कुत्रा किंवा इतर प्राण्याने चावा घेतल्यास जखम तात्काळ साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवावी. जखमेवर तेल, माती, मीठ, मिरची, चुना किंवा इतर घरगुती पदार्थ लावू नये. कुठलाही विलंब न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे मत जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभाग डॉ. उमेश जोगे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. पाळीव कुत्र्यांचे नियमित लसीकरण करणे, लहान मुलांना कुत्र्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे तसेच परिसरात भटके कुत्रे आढळल्यास त्याबाबत नगरपरिषदेला माहिती देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन सोयाम, डॉ. मेश्राम, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील डॉ. मोनिका मसारे, डॉ. लोकरे, डॉ. रंगारी, डॉ. नागतोडे, समाजसेवा अधीक्षक कबीर दरणे, कोमल चव्हाण, समाजसेवा विभागाचे नोडल अधिकारी रवींद्र निचळे तसेच जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थी आणि इंटर्न उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित