४ नोव्हेंबरला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची काम वाटप सभा
यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची काम वाटप सभा बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता वि. अ. शिरभाते यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment