नवोदय विद्यालय प्रवेश अर्ज भरण्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
यवतमाळ, दि. 19 (जिमाका) जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ करिता इयत्ता ९ वी व ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इयत्ता ९ वी व ११ वीची प्रवेश परीक्षा १० एप्रिल २०२७ रोजी होणार आहे.
इयत्ता ९ वीच्या प्रवेशासाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsix_9/ या संकेतस्थळावर, तर इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी https://cbseitms.nic.in/2026/nvsxi_11/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. हे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्जांमध्ये ग्रामीण व शहरी, जात, अपंगत्व आणि लिंग यासंबंधी दुरुस्ती करण्यासाठी २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तीन दिवस दुरुस्ती विंडो उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment