जिल्ह्यात सर्व न्यायालयामध्ये 12 डिसेंबरला लोकअदालतीचे आयोजन

यवतमाळ, दि. 19 (जिमाका) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १2 डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ आणि जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये कामगार न्यायालये व औद्योगिक न्यायालय,कौटुंबिक न्यायालय,ग्राहक तक्रार निवारण आणि इतर सर्व न्यायालये तसेच न्यायाधिकरणे राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे,वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बॅका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. सदर लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजीक कार्यकते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही व लोकअदालतीचे निवाडयाविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणाऱ्या निवाडयाची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद याबाबी टाळल्या जातात. येणे प्रमाणे लोकअदालतीमध्ये वाद मिटविल्याने वेळेची व पैशाची बचत होते. तसेच प्रकरण न्यायालयात चालविण्या करीता होणा-या त्रासातुन सुटका होते व त्वरीत आपसी संमतीने न्याय मिळतो. संबंधित पक्षकारांनी आपली प्रकरणे दिनांक १२ डिसेंबर, २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबधीत न्यायालयात अर्ज सादर करावा आणि दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच जिल्ह्यातील ईतर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद एल. यावलकर, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव दिपक एच. दाभाडे, जैन, अध्यक्ष, जिल्हा वकील संघचे अध्यक्ष संजय टी. जैन, यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित