दिवाळीनिमित्त विशेष रात्रकालीन पार्सल बुकिंग सुविधा

> मुख्य टपाल घर परिसरात यवतमाळ सॉर्टिंग काउंटर सुरू यवतमाळ, दि. 21 (जिमाका) : दिवाळी सणानिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य टपाल घर परिसरातील यवतमाळ सॉर्टिंग काउंटरवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगसाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे काउंटर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काउंटरवर स्पीड पोस्ट, देशांतर्गत पार्सल, आंतरराष्ट्रीय पत्रे, पार्सल आणि ईएमएस सेवा उपलब्ध राहणार आहेत. दिवाळीनिमित्त नातेवाईकांना भेटवस्तू, मिठाई व फराळ पाठविण्यासाठी नागरिकांनी या विस्तारित सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे डाक सेवा, यवतमाळचे अधीक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे. परदेशात पार्सल पाठविताना संबंधित देशाचे आयात नियम व सीमाशुल्क नियमांची माहिती काउंटरवरून घ्यावी. खाद्यपदार्थ पाठविण्यापूर्वी त्यांचे योग्य पॅकिंग व सुरक्षित सीलिंग करावे, तसेच संबंधित देशात त्या पदार्थांच्या आयातीस परवानगी आहे का, याची खात्री करावी. दिवाळीच्या काळात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल पाठविण्यासाठी टपाल विभागाच्या या विशेष सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे डाक सेवा, यवतमाळ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित