अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि. 21 (जिमाका) अनुसूचित जमातीच्या इयत्ता ११ वी व १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव https://etribevalidity.trti-maha.in या संकेतस्थळावर ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वैधता प्रमाणपत्रासाठी अचूक ऑनलाइन अर्ज, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक नमूद करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत व परिपूर्ण प्रस्ताव समिती कार्यालयात सादर करावा. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मुदतीत सादर करण्यासाठी संबंधित शाळा व महाविद्यालयांनी १० डिसेंबर २०१९ च्या शासन निर्णयाचे पालन करावे, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित