माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जिल्हा दौरा

यवतमाळ, दि. 30 (जिमाका) : भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार दुपारी १ वाजता पुसद जि. यवतमाळ येथे आगमन, दुपारी १.१५ वाजता पुसद येथे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी २ वाजता पुसद येथे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालय, पुसद येथे प्रस्तावित वकील भवनाच्या कोनशिला समारंभाला उपस्थिती, त्यानंतर ४.३० वाजता नागपूरकडे रवाना होतील. पोहरादेवीत नगारा भवन व बंजारा विरासतला भेट देणार माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे शनिवारी सकाळी १०.३० वाजता पोहरादेवी येथील नगारा भवन व बंजारा विरासतला भेट देतील. यावेळी त्यांच्यासोबत मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हेही उपस्थित राहती

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित