अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उदयोजकांसाठी मनी मार्जिन योजना

यवतमाळ, दि. 21 सप्टेंबर (जिमाका):- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तसेच दि. 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या सेवा पंधरवाडा कालावधीत यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील व्यक्तींना सदर योजनेकरिता इच्छुक लाभार्थी यांनी आपला प्रस्ताव दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यवतमाळ यांचेकडे सादर करावा. सदर प्रस्ताव शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित