तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षकांची नियुक्तीची कार्यवाही रद्द

यवतमाळ, दि. २ जून (जिमाका):- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडातर्फे सुरु असलेल्या १८ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सन २०२३-२४ मध्ये तात्पुरती व्यवस्था म्हणुन कायम स्वरुपी शिक्षक नियुक्ती होईपर्यंत तासिका पध्दतीने उच्च माध्यमिक शिक्षक/ माध्यमिक शिक्षक/ प्राथमिक शिक्षक या पदासाठी होणारी नियुक्ती प्रक्रिया थांबविण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये सन २०२३-२४ च्या शैक्षणिक सत्रापासून एकही कर्मचारी रोजंदारी तासिका तत्वावर घेण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे. त्यानुसार या प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या १८ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सन २०२३-२४ मधील तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपातील शिक्षकांची नियुक्तीची कार्यवाही रद्द करण्यात येत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित