कारगील विजय दिवसानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ, दि १३ (जिमाका) : बुधवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २४ वा कारगील विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी युध्द विधवा, वीरमाता यांचा सत्कार कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक, तसेच कुटुंबियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रकाश राऊत, यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित