जिल्ह्यातील सर्व दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू


 

यवतमाळ, दि. 9 :  जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित ठिकाणी दिनांक 9 जुलैपासून सर्व  दुकाने व बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी एका आदेशान्वये मुभा दिली आहे.

तथापि दुकाने किंवा बाजारपेठ येथे गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्यासचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील. यापूर्वी अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व बाजारपेठा व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या कालावधीत शासन निर्देशानुसार बदल करून आता अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने वगळून सर्व बाजारपेठा व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वरील आदेश प्रतिबंधीत क्षेत्रास लागू नाही.

उपरोक्त आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, व इतर संबंधीत कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी कळविले आहे..

00000


Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती