'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : आठ जणांना सुट्टी


Ø 10 कोरोनाबाधित रुग्णांची भर

यवतमाळ, दि. 19 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे आठही जण सुरवातीला पॉझेटिव्ह आले होते. उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी दहा नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.

आज (दि. 19) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये सहा पुरुष आणि चार महिला आहेत. यात सर्वाधित आठ जण पुसद येथील आहेत. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील मधूकर नगर येथील एक पुरुष तसेच पुसद येथील चार पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील मशीद वॉर्ड येथील एक पुरुष आणि आर्णि तालुक्यातील खेड येथील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत 157 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज (दि. 19) नवीन 10 पॉझेटिव्ह रुग्णांची  भर पडल्याने ही संख्या 167 वर पोहचली. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या आठ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 159 एवढी झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 101 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 58 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 558 झाली आहे. यापैकी 382 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 17 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 128 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 84 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 9349 नमुने पाठविले असून यापैकी 9115 प्राप्त तर 234 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8557 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती