जिल्ह्यात 57 जणांची कोरोनावर मात ; 49 नव्याने पॉझेटिव्ह

 


Ø एकाचा मृत्यु

यवतमाळ, दि. 27 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 57 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 49  जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका  कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.

मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 51 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.27) रोजी एकूण 416 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 49 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 367 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 405 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9981 झाली आहे. आज 57 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8876 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 318 मृत्युची नोंद आहे. 

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 89475 नमुने पाठविले असून यापैकी 89121 प्राप्त तर 354 अप्राप्त आहेत. तसेच 79140 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती