जिल्ह्यात चार जणांचा मृत्यु ; 64 नव्याने पॉझेटिव्ह

 

Ø 43 जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 64 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 43जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 65 आणि 50 वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील 70 वर्षीय महिला आणि इतर ठिकाणच्या 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 606 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 64 नव्याने पॉझेटिव्ह तर 542 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 520 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्या 152 पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9756 झाली आहे. आज (दि.22) 43 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8679 आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 313 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 87322 नमुने पाठविले असून यापैकी 86681 प्राप्त तर 641 अप्राप्त आहेत. तसेच 76925 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती