कारगील विजय दिवसानिमित्त 26 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन

यवतमाळ, दि. 20 जुलै (जिमाका) :- मंगळवार दि. 26 जुलै 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली 23 वा कारगील विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याप्रसंगी युद्धविधवा, वीरमाता यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक/ कुटुंबियांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती