बकरी ईदनमित्त मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

यवतमाळ, दि 7 जुलै (जिमाका) :- यवतमाळ जिल्ह्यात दिनांक 10 जुलै रोजी बकरी ईद सण साजरा होणार आहे. सदर दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावा यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या मद्य विक्री करिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निर्गमित केले आहे. बंदच्या कालावधीत अनुज्ञप्ती मद्य विक्रीसाठी उघडी ठेवू नये. तसे आढळून आल्यास संबंधीत अनुज्ञप्ती व अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित