सुशिक्षित बेरोजगारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा
यवतमाळ,दि.१२ डिसेंबर(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ऑनलाईनरोजगार मेळाव्याचे आयोजन १४ डिसेंबर, 2022 पर्यंत करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्याकरिता जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन
पद्धतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विद्या शितोडे यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर तसेच इतर ठिकाणी औद्योगिक संस्थांकडुन मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. मागणीला अनुसरून जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणाच्या कंपनीशी संपर्क साधून मुथूट फायनान्स यवतमाळ,नव किसान बायोप्लँटेक लि. नागपूर व परम स्किल ट्रेनिंग प्रा. लि. औरंगाबाद, अभिनव ईन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट ठाणे, अपोले होम हेल्थ केयर लि. मुंबई या कंपनी मार्फत एकूण 645 रिक्त पदाकरिता ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यामध्ये किमान 12 वी.परीक्षा उत्तीर्ण, अभियांत्रिकी पदविका, अभियांत्रीकी पदवी नर्सिंग पदविका,नर्सिंग पदवी धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना त्यांच्याकडील सेवा योजना कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड) चा युजरनेम व पासवर्ड लॉगिन करून सदर मेळाव्यामध्ये सहभागी होता येणार आहे.
त्यासाठी उमेदवाराकडे सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड)चा युजर नेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. नसल्यास rojgar.mahaswayam.gov.in यासंकेतस्थळावरूनऑनलाइन पद्धतीने कार्ड ची नोंदणी करता येईल.
सदर मेळाव्यास उद्योजकां कडून ऑनलाईन पद्धतीने मुलाखती/उमेदवाराशी प्रत्यक्ष संपर्क साधून रिक्त पदांकरिता निवड करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्याचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा, तसेच मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी 07232-244395 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विद्या शितोडे यांनी केले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment