ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
यवतमाळ, दि. १२ डिसेंबर (जिमाका):- आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका व बाजरी खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे.
महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे.
या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही. त्यामुळे शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तशा सूचना ७ डिसेंबर २०२२ रोजी शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे.
खरेदीची अंतिम मुदत दिनांक १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर शेतकऱ्यानी ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.
स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु" ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी, पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत सामुदायिक घनकचरा व्यवस्थापन सुविधांचे स्वयंमूल्यांकन व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. कंपोस्ट खड्डे, कचरा वर्गीकरण शेड, कचरा संकलन वाहने तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट्स यांच्या कार्यस्थितीची तपासणी करण्यात येणार आहे. यासोबतच ग्रामीण भागातील जुन्या कचरा डेपोची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची ओळख पटवून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापन नियम २०...
Comments
Post a Comment