सधन कुक्कुट विकास गटासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ,दि.३०मे.(जिमाका):-जिल्हयात “सार्वजनिक- खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे"ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपुर्ण अर्ज ८ जुन २०२३ पर्यंत संबंधीत पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांचेकडे सादर करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजेंद्र अलोने यांनी केले आहे. सदर योजने अंतर्गत यवतमाळ तालुक्यामध्ये सधन कुक्कुट गट अस्तित्वात असल्यामुळे यवतमाळ तालुका वगळता इतर १२ तालुक्यात ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत झरी व पुसद तालुक्यातील लाभार्थी निवडी करीता अर्ज प्राप्त न झाल्यामुळे लाभार्थी निवड झाली नाही व घाटंजी तालुक्यात मंजुर लाभार्थ्यानी योजनेचा लाभ घेतला नाही. सदर तालुक्याअंतर्गत लाभार्थी निवडी करीता, पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांचे निर्देशनावरून पुसद, झरी व घाटंजी तालुक्यात प्रत्येकी एक लाभार्थी निवडीकरीता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज व सविस्तर माहीतीसाठी संबंधीत पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती