पीक स्पर्धेसाठी अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत

यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या स्पर्धेतील हंगाम निहाय पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले.
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, रागी, तूर, सोयाबीन, भुईमुग , सूर्यफुल इत्यादी पीक उत्पादक शेतकऱ्यांनी या पीकस्पधेत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडून विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. यासह प्रवेश शुल्काचे चलन, सात बारा व नमुना आठ अ चा उतारा आणि आदिवासी शेतकऱ्यांनी जात प्रमाणपत्र सोबत जोडून अर्ज सादर करावा.स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी,पर्यवेक्षक व कृषी सहायक यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित